गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला येथील दीड वर्षीय चिमुकलीच्या घशात तुरीची शेंग अडकली. यामुळे श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला येथे घडली.
ज्ञानदा विजय आरदड असे मृत चिमुकलीचे नाव आहे. शनिवारी सकाळी ज्ञानदाची आई घरकामात व्यग्र असताना ती बाहेरील मोकळ्या जागेत खेळत होती. यावेळी तिने तुरीची शेंग तोंडात घातली.
काही वेळाने शेंग घशात अडकल्याने तिला श्वास घेताना त्रास होत असल्याचे आईच्या लक्षात आले. तिला कुटुंबीयांनी तत्काळ रामपुरी येथील खासगी रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तिला बीडला हलविण्याचा सल्ला दिला.