जळगाव (प्रतिनिधी) – मुस्लीम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टची सार्वत्रिक निवडणूक 2024 औपचारिकतेसह पूर्ण करण्यासाठी वक्फ बोर्डाचे प्रतिनिधी आणि जळगाव स्तरावरील नियुक्त निवडणूक अधिकारी यांनी संबंधित सर्व तोंडी व लेखी आदेश व घोषणा प्रसिद्ध करणे आवश्यक आहे जी वक्फ बोर्ड कायदा आणि जळगाव ट्रस्टच्या उपनियमांनुसार असावी.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ट्रस्टच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला ईद गाह ट्रस्ट कार्यालयातील निवडणुकीच्या कामात हस्तक्षेप करण्यास मनाई करण्यात यावी जेणेकरुन ही सर्वसाधारण सभेची निवडणूक सुरळीतपणे पार पडेल. सध्या निवडणूक कार्यालयातील सर्व कामे ट्रस्टच्या मोजक्या विश्वस्तांच्या देखरेखीखाली व सूचनेनुसार होत असल्याचे दिसून येत आहे, हे अजिबात योग्य नाही. निवडणुकीच्या काळात कार्यालयीन कामकाजासाठी तीन नियमित लिपिक आणि एक शिपाई तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात यावे, जे केवळ वक्फ बोर्ड निरीक्षक आणि निवडणूक अधिकारी यांना जबाबदार असतील.
या लोकांचा मानधन सभासदत्वासाठी जमा झालेल्या फीमधून देण्यात यावी. 1996 ची मुस्लिम लोकसंख्या आणि आजची 2024 ची मुस्लिम लोकसंख्या मध्य लक्षणीय वाढली असल्याने होणाऱ्या या निवडणुकीत जळगाव शहरातील सर्व मुस्लिम वस्त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे प्रतिनिधित्व देण्यात यावे. त्यामुळे या निवडणुकीत वॉर्डांची संख्या 15 वरून 19 पर्यंत वाढवावी, गरज भासल्यास मुस्लिम लोकसंख्या असलेल्या मोठ्या वस्त्यांना न्याय देऊन 2/3 वॉर्ड वाढवता येतील.
वक्फ बोर्डाने दाखल केलेल्या लेखी अपीलचा पूर्ण विचार करून जळगाव मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टची सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ट्रस्ट व जनता या दोघांनाही मदत होईल, अशी आशा आहे.