जळगाव (प्रतिनिधी) – येथील रिफॉर्मेशन आणि सैफअली व जीशान सौदागरसह टीम तर्फे नुकतीच नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडली.
या व्हॉलीबॉल स्पर्धेत अल अकसाला विजेतेपद तर वाजिद फाउंडेशन यांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होते. या नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन इकरा संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल अजीज सालार होते.
यात फायनलमध्ये अल अकसा संघाने वाजिद फाउंडेशन यांनी विजेतेपद पटकावले. यावेळी आयोजक रिफॉरमेशन टीम आणि सैफअली यांच्या हस्ते विजेत्या आणि उप विजेत्या संघाला रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.