जळगाव (प्रतिनिधी) – धक्कादायक बातमी समोर येत आहे. भीक मागणाऱ्या एका १२ वर्षीय गतीमंद बालिकेवर बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शुक्रवार ५ रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीला शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सूत्राने दिलेल्या माहितनुसार जळगाव शहरातील एका चौकात १२ वर्षीय गतिमंद बालिका भीक मागण्यासाठी बसली होती. त्याचवेळी आरोपी वसीमखान कय्युमखान (२५) याने या बालिकेला दुचाकीवर बसवून राष्ट्रीय महामागविर दुरदर्शन टॉवरजवळील एका शेतात नेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
घडलेल्या प्रकरणी पीडितेने पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी खानला शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणी करुन न्यायालयात हजर केले. या प्रकरणी सरकारी वकील अॅड. रमाकांत सोनवणे यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने संशयितास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.