प्रेमप्रकरणाच्या संशयावरून मोठ्या भावाचा बहिणीसोबत शाब्दीक वाद झाला. या वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले आणि भावाने बहिणीचा गळा दाबला. यात तिचा मृत्यू झाला. ही घटना भंडारा तालुक्यातील वरठीलगतच्या सोनुली येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी आशिष गोपीचंद बावनकुळे याला अटक केली आहे. अश्विनी बावनकुळे असे मृत बहिणीचे नाव आहे.
गोपीचंद बावनकुळे यांना एक मुलगा व मुलगी आहे. पती-पत्नी मोलमजुरी करतात. घटनेच्या दिवशी आई-वडील बाहेरगावी गेले होते. आशिष व अश्विनी दोघे घरी होते. दुपारी दोघांत बहिणीच्या कथित प्रेमप्रकरणावरून शाब्दीक वाद झाला. या वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. यावेळी आशिषने अश्विनीच्या नाका तोडावर बुक्क्या मारल्या व तिचा गळा आवळला. यात ती गतप्राण झाली, या घटनेनंतर कुठेही वाच्यता न करता तो गावातच थांबून राहिला. तसेच बहीण छतावरून पडल्याचे आई-वडिलांना सांगितले.
पोलिस पाटलांनी घटनेबाबत पोलिसांना सायंकाळी माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात हलवला, यावेळी आशिष पोलिसांसोबत दवाखान्यात होता. शवविच्छेदन अहवालात सर्व उघड होण्याची कल्पना येताच त्याने रात्री दवाखान्यातच खुनाची कबुली दिली. परीक्षेकरिता आली होती. अश्विनी नागपूरला मावशीकडे राहायची. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने ती नागपूरला व्यावसायिक शिक्षण घेत होती, १२ वी नंतर तिने भंडारा येथील महाविद्यालयात तात्पुरता प्रवेश घेतला होता. सध्या हिवाळी परीक्षा सुरू असल्याने ती परीक्षा देण्यासाठी सोनुली येथे आली होती.