जळगाव प्रतिनिधी – राज्यातील कोरोनाचे रुग्णाला सातत्याने वाढत असून जळगाव जिल्ह्यात देखील कोरोना आलेला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील एका गावात १ रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला असून मागच्या ३ दिवसांत एकूण ७९४ चाचण्यांमधून १ रुग्ण आढळला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ताप, खोकला व श्वासाचा त्रास जाणवू लागला, त्यांनी दि 20 रोजी एका खाजगी डॉक्टरकडे उपचार घेत असलेल्या व्यक्तीचा आज कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रुग्ण हा 6 ते 10 डिसेंबर च्या कालावधीत नेपाळ येथे गेला होता सध्या त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र एक महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या संपर्कातील १४ जन हे निगेटिव्ह आले आहे. रूग्णांची प्रकृती उत्तम आहे. एचआरसीटी रिपोर्ट २४ आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. या सर्व परिस्थितीवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून आहेत.