जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. वसंतराव मुंडे, मा. श्री. राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस मा. श्री. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या “इलेक्ट्रॉनिक मिडिया” विंग च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी पदी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे रिपोर्टर सचिन गोसावी यांची आज दिनांक 25 डिसेंबर रोजी निवड करण्यात आली आहे.
पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी नियुक्ती केली आहे. निवडीबद्दल खानदेश विभाग प्रमुख किशोर रायसाकडा,प्रमोद सोनवणे,शरद कुळकर्णी, कमलेश देवरे,योगेश चौधरी, प्रमोद रुले, विकास पातळे यांनी अभिनंदन केले आहे.