आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. अशातच केरळ मधून एक अपघाताची बातमी समोर येत आहे. प्रवाशांनी भरलेली रिक्षा आणि बसची जोरदार धडक होऊन या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, केरळ मधील मलप्पुरम जिल्ह्यातील चेतियांगडी प्रसिद्ध सबरीमालाचे दर्शन घेऊन काही भाविक परतत होते. यावेळी चेटियांगड्डी येथे मंजेरी-एरिकोड मार्गावर भाविकांनी भरलेली बस आणि रिक्षाची भीषण धडक झाली. या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांमध्ये एकाच परिवारातील चौंघाचा समावेश आहे. या अपघातात अनेक जण जखमी असून जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सबीरा, मोहम्मद निशाद, आशा फातिमा, मोहम्मद आसन आणि रेहान अशी मृतांची नावे आहेत.