संगीत विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. प्रसिद्ध गायक अनुप घोषाल यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराचा धक्क्यानं प्रसिद्ध गायक अनुप घोषाल यांचं निधन झालं आहे. यामुळे संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सवितर माहिती अशी कि, मागच्या काही दिवसांपासून अनुप घोषाल यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. यादरम्यान शुक्रवारी त्यांचं हृदयविकाराचा धक्क्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनुप घोषाल यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. अनुप घोषाल यांनी तृणमूल काँग्रेसकडून २०११ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती.