खजुरामध्ये पोषणमुल्ये जास्त प्रमाणात असतात पण तसेच खजुरामध्ये लोह आणि फ्लोरीन असतात. खजूरमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. मात्र बहुतेक करून फारसे कोणाला खजूर आवडत नाही. खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट्सही असतात. खजूर खाणे हिवाळ्यात खूप फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला जर नुसता खजूर खायला आवडत नसेल तर तुम्ही खजुराचे लाडू देखील करून खाऊ शकता. खजुराचे लाडू कसे बनवले जातात हे जाणून घेऊयात.
साहित्य
खजूर, खोबरे, बदाम, पिस्ता, काजू, तूप, खसखस
कृती
सर्वप्रथम, खजुराच्या बिया काढा आणि मिक्सरमध्ये खजूर बारीक करून घ्या. यानंतर एका कढईत तूप गरम करून खसखस टाका आणि त्यात बारीक केलेले बदाम, पिस्ता, काजू, लालसर भाजलेले खोबरे आणि खजूर मंद आचेवर परतून घ्या. नंतर एका ताटात हे सर्व मिश्रण काढा आणि हाताला तूप लावून लाडू बांधा. तयार आहेत खजुराचे लाडू.