पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील मोंढाळा रोड वरील बाजोरिया ऑइल रिफायनरीत तीन अनोळखी चोट यांनी प्रवेश करत सुरक्षारक्षकास चाकूचा भाग दाखवत ऑइल रिफायनरी तील ऑफिसमधून ४ लाख ५ हजार रुपये रोख व १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २३ जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळीचा पंचनामा करण्यात आला असून पाचोरा पोलीस ठाण्यात ३ अनोळखी चोरत्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की, शहरातील मोंढाळे रोडवरील आशिष बाजोरिया यांची बाजोरिया ऑइल रिफायनरी आहे. आशिष बाजोरिया यांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार आशिष बाजोरिया हे २२ जुलै रोजी आपले रिफायनरी व कृषक धान्य व्यवसायातून जमा झालेले ४ लाख रुपये ऑफिसच्या कपाटातील तिजोरी ठेवून दुपारी ४ वाजता घरी गेले. त्यादरम्यान घरीच उशीर झाल्याने आशिष बाजोरिया हे सायंकाळी फॅक्टरी न जाता घरीच थांबले होते, या दरम्यान 23 जुलै रोजी पहाटे ४:१५ वाजता आशिष बाजोरिया या सुरक्षारक्षक प्रकाश पाटील यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईल वरून फोन केला आणि नवीन नंबर वरून फोन आल्याने तो मी उचलला व त्यांच्यासोबत ची आपब्येती त्याने सांगितली की आपल्या फॅक्टरीत चोरी झाली आहे हे कळताच आशिष बाजोरिया यांनी घटनास्थळी धाव घेत असताना त्यांना हा ऑफिसच्या कपाटातील तिजोरीत ठेवलेले ४ लाख रुपये तिजोरीसह चोरटयांनी उचलून नेले.
आशिष बाजोरिया यांनी तात्काळ पाचोरा पोलीस स्टेशन गाठले असतात पाचोर्यातील पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असतात आशिष बाजोरिया व सुरक्षारक्षक प्रकाश पाटील यांच्या माहितीनुसार ३ अनोळखी चोरटे जाडी वाकवून त्यातून आत प्रवेश करत ऑफिसमध्ये प्रवेश केला असतात सुरक्षारक्षक प्रकाश पाटील यांच्या लक्षात येत असल्यास त्यांनी चोरट्यांना आळविण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षारक्षकास चाकूचा धाक दाखवून प्रकाश पाटील यांचे हातपाय बांधून त्यांना एका ठिकाणी बसण्याची धमकी देऊन ऑफिस मधील गोदरेज कपाटाचे लॉक तोडून कपाटातील ४ लाख ५ हजार रुपये किमतीचे इतर वस्तू व ५ हजार रुपये किमतीची तिजोरी व सुरक्षारक्षक प्रकाश पाटील यांच्या १ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा ४ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरून प्रसार झाले. घटने प्रकरणी आशिष बाजोरिया यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये ३ अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षण योगेश गणगे हे करीत आहेत.