बँके मध्ये लागणार सर्वात महत्वाचा कागज म्हणजे धनादेश (चेक) बँकेत कोणताही व्यवहार करण्यासाठी चेकचा वापर हा नियमित आणि सुरक्षित कामांसाठी केला जातो. यूपीआय UPI किंवा इंटरनेट बँकिंगच्या आधी चेक म्हणजे धनादेशचा काळ होता. व्यवसाहिक, ऑफिस च्या व्यवहारासाठी किंवा व्यक्तिगत आर्थिक व्यवहारासाठी चेकला वापरले जाते. बऱ्याच ठिकाणी चेकचा वापर अधिक प्रमाणात आहे. परंतु यूपीआय आणि इंटरनेट बँकिंगच्या युगात चेक व्दारे होणारे व्यवहार मर्यादित राहिले आहेत. धनादेशाव्दारे केलेला व्यवहार सुरक्षित मानला जातो, त्यामुळे व्यवसायिक किंवा कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी धनादेशचा वापर केला जातो.
चेक किंवा धनादेश म्हणजे काय ?
धनादेश (चेक) असा कागद आहे कि त्यामार्फत कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला पैसे देण्यासाठी तुम्ही बँकेला विनंती करता. चेकचा वापर एखाद्या संस्थेला किंवा व्यक्तीला पेमेंट करण्यासाठी केला जातो. चेक सहसा दोन ते तीन दिवसांमध्ये क्लियर केला जातो. पण काही वेळा, काही कारणास्तव चेक जास्त वेळ रोखून धरला जाऊ शकतो.
हे लक्षात राहू द्या –
मोठे व्यवहार जर करायचे असतील तर ते चेक व्दारे करा. रोख व्यवहार करण्यापेक्षा धनादेश चा वापर सोयीचे ठरते.
अनक्रॉस चेकपेक्षा क्रॉस केलेला चेक जास्त सुरक्षित असतो, कारण क्रॉस केलेला चेक फक्त बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो. क्रॉस म्हणजे अकाउंट्स पेयी म्हणजे दिलेला चेकमधील रक्कम हि समोरच्याच्या खात्यावर जमा करण्यासाठी केलेली विंनती.
अनक्रॉस चेकने सुद्धा व्यवहार होतात, जेव्हा असा चेक देऊन एखादी व्यक्ती बँकेत जाते तेव्हा चेकवरील रक्कम त्याला रोखीने मिळते. परंतु मोठ्या रक्कमांच्या चेकवरील डाव्या कोपऱ्यात क्रॉस करणे म्हणजेच चेक अकाउंट्स पेयी देणे जास्त सोईस्कर असते.
सध्या पैसे हे तोच सबकुछ सही है….! त्यामुळे कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सतर्कता नक्कीच बाळगली पाहिजे.