जळगाव (प्रतिनिधी) – शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात ८ व ९ जुलै रोजी युवासेनेतर्फे युवा संपर्क अभियान २०२३ राबविण्यात येणार आहे. यासाठी शिवसेना भवन तर्फे युवासेना मुख्य कार्यकारिणी सदस्य निलेश महाले (मुंबई) व युवासेना उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया यांना जळगाव लोकसभेतील जळगाव शहर, धरणगाव, पारोळा, भडगाव तसेच रावेर लोकसभेतील चोपडा व मुक्ताईनगर या विधानसभे ठिकाणी जाऊन आढावा बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. या युवासंपर्क अभियानात जळगाव जिल्ह्याचे युवासेना विस्तारक चैतन्य बनसोडे, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, चंद्रकांत शर्मा व पियुष गांधी सहभागी असणार आहे.
उपरोक्त विधानसभेत जाऊन आढावा बैठक, मेळावे, शाखा उद्घाटन, निवडणूकीच्या दृष्टीने बूथ रचना, संघटन बांधणी आदि कार्यक्रम या दोन दिवसात राबविण्यात येणार आहेत. युवासंपर्क अभियानाच्या यशस्वीतेसाठी युवासेना कॉलेज कक्ष जळगाव लोकसभा प्रमुख प्रितम शिंदे, युवासेना महानगर युवाधिकारी अमोल मोरे, यश सपकाळे, युवासेना कॉलेज कक्ष जिल्हा युवाधिकारी हर्षल मुंडे तसेच तालुका युवाधिकारी आदी युवासैनिक परिश्रम घेत आहेत.