चाळीसगाव (प्रतिनिधी) – शिवसेनेच्या लोकसभा जळगाव जिल्हा महिला संपर्क प्रमुख अंजली नाईक यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली व जळगाव जिल्हा महिला आघाडी संघटीका महानंदा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख डॅा. हर्षल माने (पाटील) यांच्या प्रमुख सल्यानिशी चाळीसगाव येथील महिला तालुका प्रमुख सविता कुमावत यांनी उत्तम नेतृत्व करत मोठ्या प्रमाणात महिलांची नवीन कार्यकारणी तयार केली. प्रमुख पद नियुक्त्या अंजली नाईक व महानंदा पाटील यांच्या उपस्थितीत केले. यावेळेस कार्यक्रमाचे सुत्र संचालन शैलेंद्र सातपुते यांनी केले. ज्यांच्या नियुक्त्या झाल्यात त्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत. मोहिनी केशव मगर उपजिल्हा प्रमुख चाळीसगाव, विधानसभा क्षेत्र सुनदा काटे, अनिता सुनील चव्हाण उपतालुका संघटक शिरजगाव, अंजली पिनोज काळे उपतालुका संघटक, सविता किशोर मिस्त्री उपतालुका संघटक मेहुनबार, रेखा रामदास सोनार शहर संघटक मेहुनबार, बेबाबाई संभाजी चव्हाण उपतालुका संघटक राजदेहिरे, कविता संजय साळवे शहर संघटक चाळीसगाव, निर्मला गौतम आराख शहर विभाग प्रमुख, सुनीता अशोक पवार शहर विभाग प्रमुख, सुलतानाबी अहमद खाना अल्पसंख्याक महिला आघाडी शहर अध्यक्ष, कांताबाई हिरमण राठोड शहर विभाग प्रमुख, सर्व महिलांना पद आणि नियुक्त पत्र देऊन सर्व महिला आघाडीना पदा बाबत उत्तम असे मार्गदर्शन केले.
अंजली नाईक यांनी महिलांना सांगितले कि कामगिरी करावी वेळ प्रसंगी अडचन आल्यास सविता कुमावत यांच्या कडुन मार्गदर्शन घ्यावे.अश्या शब्दात सांगितले. सर्व महिलांनी शिवसेनेचा नारा लावला सोबत चाळीसगाव येथील पुरुष ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम पाटील, अल्पसंख्यांक शहर प्रमुख वाशिम चेअरमन उपतालुका प्रमुख नाना शिंदे, गट प्रमुख देवाचंद साबळे, विभाग प्रमुख आशिष सानप तमगव्हाण, अरूण पाटील तमगव्हाण, माजी तालुकाप्रमुख महेंद्र जयस्वाल, उपतालुका प्रमुख संजीव पाटील पातोंडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, शहर प्रमुख युवा सेना रॉकी धामणे, निलेश गायके उपशहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, हिम्मत निकम, संजय साबळे, दिलीप पाटील शिरजगाव, अरूण पाटील आदी पदाधीकारी यांनी सदैव महिलांसोबत त्यांच्या प्रत्येक कामात सहभागी राहु अशी ग्वाही व्यक्त केली व महिला मेळाव्यास भरघोस असा प्रतिसाद दिला. जातांना सर्व महिलांनी सविता कुमावत यांचे कौतुक केले आणि सर्व ग्रामीण व शहर शिवसेना पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानले.