अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेरचे मंत्री बनल्यानंतर पहिल्यांदा जिल्ह्यात अनिल भाईदास पाटील यांचे उद्या सकाळी जळगाव येथील रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
अमळनेरचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोद अनिल भाईदास पाटील हे नव्याने मंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदा जिल्यात येणार आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद तसेच अन्न व नागरी पुरवठा हे महत्वाचे खाते दिले जाण्याची शक्यता मुंबई येथील सूत्रधारका कडून व्यक्त केले जात आहे. मात्र या बाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही तरी खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
धुळ्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांचा उद्या दि. ७ जुलै रोजी वाढदिवस असून त्याच दिवशी मंत्री महोदय हे जळगाव येथे आगमन झाल्यानंतर ते अमळनेर येथे मंगलग्रह मंदिरात दाखल होणार असून त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे. तेथून ते ९ वाजता बाईक रॅलीव्दारे त्यांची भव्य दिव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे. सदर रॅली पैलाड, तेथून दगडी दरवाजा, पाच कंदील चौक, सुभाष चौक, कुंटे रोड, बालेमिया, बस स्टँड येथून त्यांच्या निवासस्थानी दाखल होऊन दिवसभर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते घरी थांबणार आहेत.