जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यानंतर पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना हि भाजप तर्फे ओबीसी नेत्यांना त्रास दिला जातोय असा आरोप खडसेंनी केला आहे. “भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना त्रास दिला जातोय. उभं आयुष्य ओबीसी नेत्यांनी भाजपमध्ये घालवलं. मीही त्यात होतो. एकनाथ खडसेंना किती त्रास दिला जातो हे संपूर्ण जग पाहतोय”, असं ते म्हणाले. “विनोद तावडे आणि अनेक नेत्यांनी आम्ही वर्षं वर्ष सोबतकाम केलं आहे. माझा कोणत्याही स्थितीत भाजपमध्ये वापर होऊ नये, असं तावडेंना वाटणं स्वाभाविक आहे”, असं खडसे म्हणाले.”तसेच काहीही झालं तरी मी भाजपमध्ये पुन्हा जाणार नाही”, असं खडसे म्हणाले. “चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, देवेंद्र फडणवीस यांनी मला ७ खाती दिली होती. पण ७ खाती नाहीतर १२ खाती दिली होती. पण त्याचं कारण माझ्या कर्तुत्वाने ती खाती मला मिळाली होती, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे”. “देवेंद्र फडणवीस हे मान्य करतील की त्यांना अध्यक्ष करण्यास मी प्रयत्न केला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव मी देवेंद्र फडणवीस यांना अध्यक्ष पद द्यायला लावलं”, असं देखील खडसे म्हणालेत.