धुळे (प्रतिनिधी) – धुळ्या नजीक मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला आणि हॉटेल मध्ये नास्था करण्यासाठी आल्या लोकांवर हे कंटेनर पडले असून या अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत.
अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलात शिरला. या अपघातात तेरा जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० जण जखमी झाले आहेत. दुपारी बार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. दरम्यान या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून जखमींची मदत तात्काळ केली जात आहे.