जळगाव (प्रतिनिधी) – गुरुपौर्णिमे निमित्त जळगावातील मेहरूण परिसरात असलेल्या साई मंदिरात सोमवारी महाआरती करण्यात आली. तसेच यावेळी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे देखीलआयोजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षा पासून साई बाबा मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते, या हि वर्षी आम्ही आनंदात साजरा केली.
दरम्यान परिसरातील साई भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्याचबरोबर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजक साईभक्त तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले. यावेळी परिसरातील मान्यवर उपस्थित होते.