अमळनेर (प्रतिनिधी) – राज्याच्या राजकारणात २ जुलै रोजी मोठी खळबळ उडाली आहे. भाजप व शिंदे गटासोबत आता शिवसेनेसोबत राष्ट्रवादीने हात मिळवणी करत उपमुख्यामंत्री पदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ९ आमदारनी मंत्री पदाची शपथ घेतली असून यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदार संघातील आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सुद्धा शपथ भेटली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याला तीन मंत्री मिळालेली आहे. आता जिल्ह्याचा विकास किती लवकर होणार याच्या कडे सगळ्यांचे लक्ष लागून राहणारं आहे.
अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील हे नेहमीच अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जात असल्यामुळे त्यांना या सरकारामध्ये मंत्री पदांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यावेळी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे व अनिल पाटील यांना देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.