जळगाव (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार, दि. ४ जून २०२४ ला जाहीर होत आहे. हा निकाल देशातील सत्तेची पुनर्स्थापना किंवा परिवर्तन या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदार संघातील निकालाविषयी मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची संभावित राजकिय गणिते लोकसभा निवडणूक निकालावरून दिसतील. देशाचा लोकसभेचा आणि महाराष्ट्र विधानसभेचा संभावित कौल हा मतदारांना जाणून घ्यायचा आहे. ही बाब लक्षात घेऊन जळगाव मधील प्रसार व जाहिरात माध्यम क्षेत्रातील सर्वाधिक अनुभवी मंडळी ‘चुनावी फैसला … कोण जिंकला कोण हरला ?’ या ११ तासांच्या लाईव्ह कार्यक्रमातून करणार आहे. या कार्यक्रमाची संरचना खालील प्रमाणे आहे.
ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, ‘इंडिया आपतक’ केबल चॅनेलचे संपादक आनंद शर्मा, ‘क्लिअर न्यूज’ पोर्टलचे संपादक विजय वाघमारे हे सकाळी ८ ते सायंकाळी ७ अशा ११ तासांचा ‘चुनावी फैसला … कोण जिंकला कोण हरला ?’ हा कार्यक्रमाचे सूत्रसंचालित करतील. दिवसभरात १० टप्प्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत निकालाचे विश्लेषण होणार आहे. तर या कार्यक्रमाचे इव्हेन्ट मॅनेजमेंट मल्टिमीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक परितोष सुशील नवाल व सहकारी हे करणार आहेत. हा कार्यक्रम रेड टीव्ही केबलवर चॅनल नंबर ५२ आणि ७२ वर बघता येणार आहे. तसेच इंडिया आपतक न्यूजच्या युट्युब चॅनल (https://www.youtube.com/channel/UCLcY4UR9NfaT_wDgj4CF38w/live) आणि फेसबुक पेज (https://www.facebook.com/profile.php?id=100064272390190&mibextid=ZbWKwL) द क्लिअर न्यूजच्या देखील युट्युब चॅनेल (https://youtube.com/@theclearnews5119?si=JF4U_vIh53CRg5vK) व फेसबुक पेजवर (https://www.facebook.com/share/bXKDy9yfTuDThqox/?mibextid=LQQJ4d) यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव हेडलाईन्स न्यूजच्या यूट्यूब चैनल https://www.youtube.com/@Jalgaonheadlineslive लाईव्ह बघता येणार आहे.
जळगाव व रावेर मतदार संघातील निकालाचे विश्लेषण तालुका व मतदार संघनिहाय बारकाव्याने केले जाणार आहे. या शिवाय धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील इतर चार मतदार अंकासाठी आढावा असेल. जळगाव जिल्ह्यातील मतदारांसाठी सर्वात उत्सुकतेचा निकाल हा उत्तर मध्य मुंबई असेल. या मतदार अंगात भाजपकडून खान्देशपुत्र राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम हे रिंगणात आहेत. तसेच राज्यभरातील मतदारांसाठी सर्वाधिक उत्सुकतेची लढत हि बारामती मतदार संघात आहे. तेथे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चुरशीची लढत आहे. याशिवाय नागपूर मतदार संघात नितीन गडकरी, बीड मतदार संघात पंकजा मुंडे यांच्याही निकालाकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. जळगाव, रावेर मतदार संघातील लढतीसह वरील सर्व मतदार संघातील लढतींविषयी अत्यंत बारकाव्याने निकालाचे विश्लेशन करण्याची यंत्रणा ‘चुनाव का फैसला … कोण जिंकला कोण हरला ?’ या कार्यक्रमात करण्यात आली आहे.
जळगावातील मान्यवर पत्रकार हे निकालाचे गणित उलगडून सांगणार आहेत. तसेच या कार्यक्रमात राजकिय, सामाजिक, व्यापार, उद्योग, कला, सांस्कृतिक अशा क्षेत्रातीलही जवळपास १५० हुन अधिक मान्यवर आणि तालुका स्तरावरील २० वर पत्रकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा भरातील कोणताही मतदार निवडणूक निकाल आणि निवडणूक प्रक्रिये विषयी व्हाट्सअपच्या माध्यमातून टेक्स, ऑडीओ, व्हिडीओ माध्यमातून स्वतःची प्रतिक्रिया, अनुभव नोंदवू शकेल. यासाठी व्हाट्सअप क्रमांक ७३५०७२४३६५ हा सकाळी ८ ते सायंकाळी ७ प्रर्यंत उपलब्ध असेल. या नंबरवर केलेल्या कोणत्याही कॉलला उत्तर दिले जाणार नाहीय. तर फेसबुक, युट्युबवर आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया देखील समाविष्ट केले जाणार आहेत.