जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात गुरुवारी सायंकाळी वर्क फाउंडेशनतर्फे चौकाचौकात शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत तंबाखूविरोधी जनजागृती करण्यात आली. हातात फलक घेऊन नागरिकांना तंबाखूचे व्यसन सोडविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून गुरुवारी जळगावात वर्क फाऊंडेशनतर्फे शहरातील विविध चौकात जनजागृती करण्यात आली. नवीन बसस्थानक परिसरात शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक देवीदास इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
वर्क फाऊंडेशनच्या सदस्यांनी हातात तंबाखू को जिसने गले लगाया, मौत को उसने पास बुलाया.., नाही म्हणा तंबाखुला, सुखी राही संसार आपला.., आपका धुम्रपान सबके स्वास्थ के लिये हानिकारक हैं अशी घोषवाक्ये लिहिलेले फलक हातात घेऊन जनजागृती केली. नवीन बसस्थानक, कोर्ट चौक, टॉवर चौक, अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौकात जनजागृती करण्यात आली.
उपक्रमाप्रसंगी वर्क फाऊंडेशनचे इशरत जहां, सरवत जहां, आमेना शेख़, निखत शेख़, आफ़रीन खाटीक, अयमन खाटीक, अफ़साना ख़ान, रंजना सपकाळे, मुबीना परवीन, इमरान खाटीक, फरीद खाटीक, एजाज सय्यद, इमरान शेख़, स्वप्नील अहिरे, राहुल सानप, वकार खान आदी उपस्थित होते.