पारोळा (प्रतिनिधी) – लोकसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शेतकरी संघटनेनी काय भूमिका घ्यावी ? कोणत्या पक्षाला समर्थन करावे किंवा करू नये ? शेतकरी हितासाठी कोणता पक्ष, उमेदवार महत्त्वाचा असू शकतो या संदर्भात महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या अध्यक्षतेखाली अकरा तारखेला बैठकीच्या आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या सर्व जिल्हा अध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी सदस्य, पंचायत समिती गणप्रमुख, जिल्हा परिषद गट प्रमुख तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष,युवा अध्यक्ष सर्व शाखा अध्यक्ष यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच ईतर महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. बैठक संघटनेच्या मुख्य संपर्क कार्यालय पारोळा येथे होत असून संघटनेच्या लोकसभा मतदारसंघात २६० शाखा असून याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.