जळगाव (प्रतिनिधी) – शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार करण बाळासाहेब पाटील पवार यांच्या प्रचारा निमित्त सहभाग घेण्यासाठी जळगावत मंगळवारी दिनांक ७ मे रोजी येत आहे सायंकाळी ५.३० वाजता त्यांची सभा होणार आहे.
सभे निमित्त माजी खासदार उन्मेष पाटील यांनी सोमवारी दिनांक सहा रोजी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. सभे निमित्त शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, असीम सरोदे, सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी खासदार उन्मेष पाटील, उमेदवार करण पवार पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, वैशाली सूर्यवंशी, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, तसेच आधी उपस्थित राहणार आहेत.
सभेमध्ये उद्धव ठाकरे सत्ताधारी पक्षाच्या कार्याचा समाचार घेणार असून मतदारसंघातील जनतेला आवाहन करणार आहे. आजच्या सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे लक्ष लागून आहे.