रावेर (प्रतिनीधी) – चारच काय ४०० विकास कामे सांगते असा विकास कामांचा दावा करणाऱ्या खासदार रक्षा खडसे यांना विनोद तराळ यांनी केलेल्या कामांबाबत आव्हान दिले आहे. आपण केलेल्या ४०० विकास कामांची यादी मुक्ताईनगर मधील प्रवर्तन चौकात लावावी, तिथे थेट या विषयावर त्यांच्याशी मी चर्चा करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. रावेर तालुक्यातील कोचूर येथे काही गावकऱ्यांनी त्यांना ४ विकासकामे सांगा असा प्रश्न विचारला असता रक्षा खडसेंनी या युवकांना दारुडे ठरवलं आहे, व्यसनाधीन ठरवले आहे. मात्र गळ्यात तुळशीची माळ घालणारा हा कोचूर येथील कष्टाळू वर्ग असून त्यांच्यावर आरोप करून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्रच रक्षा खडसे करत असल्याचे त्यांनी सांगितले. कुऱ्हाकाकोडा येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे आव्हान दिले.
कुऱ्हाकाकोडा परिसरात प्रचार रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे विद्यमान लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी भेटी दरम्यान व्यक्त केली. केळीवरील सीएमव्ही रोगाचे संशोधन व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी मागणी करूनही त्यांनी कधीही हा प्रश्न संसदेत मांडला नसल्याचेही विनोद तराळ यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ जगदीश पाटील यांचीही भाषणे झाली. मेगा रिचार्ज, बोदवड उपसा जलसिंचन योजना, औद्योगिक विकास आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर भर देऊन प्राधान्याने हे प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन शरीर पाटील यांनी यावेळी दिले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, कुऱ्हा काकोडा येथील लोकनियुक्त सरपंच बी सी महाजन, ईश्वर रहाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुका प्रमुख शिवाजी पाटील, पक्षाचे तालुकाध्यक्ष यू.डी पाटील, दिनेश पाटील, एजाज मलिक, छाया साबळे, प्रवीण कांडेलकर, विलास हिरोळे, विशाल रोटे, राजू जाधव, छगन राठोड, मुबारक तडवी, अशोक माळी, ज्ञानदेव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले आभार मयूर साठे यांनी मानले.