जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी योगशिक्षक सुनिल गुरव यांची नियुक्ती करण्यात आले आहे. त्यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
याबाबत अधिक असे की, योगा फाऊंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघाची स्थापना करण्यात आली आहे. या संघाच्या माध्यमातून संपुर्ण राज्यात योगासंदर्भात मार्गदर्शन आणि जनजागृती केली जात आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी योगशिक्षक सुनिल गुरव यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांनी केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
योगशिक्षक सुनिल गुरव हे मु.जे.महाविद्यालयात ग्रंथालय विभागातून सेवानिवृत्त झालेले आहे. सन २००६ ते २०१२ दरम्यान त्यांनी मु.जे. महाविद्यालयातील योग विभागात योगशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. शिवाय ते खासगी मेहरूण परिसरातील सिध्दार्थ लॉन येथे योगवर्ग घेत आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याकडे महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या जिल्हाध्यपद यशस्वीपणे संभाळले आहे. त्यांच्या पत्नी अर्चना सुनिल गुरव आणि मुलगी नेहा गुरव ह्या देखील योगशिक्षिका आहेत. सुनिल गुरव हे गेल्या १८ वर्षांपासून योगा आणि प्राणायाम याबाबत प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने काम करत आहे. त्यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.