जळगाव (प्रतिनीधी) – सिंधी दिनानिमित्ताने (चेट्री चंड्र) निघालेल्या भव्य रॅलीमध्ये राजकीय कलगीतुरा पाहायला मिळाला. शोभायात्रा मध्ये सुरुवातीलाच उबाटा गटाचे उमेदवार करण पवार हे सहभागी झाले होते. मिरवणूक जी.एम फाउंडेशनच्या पुढे सरकल्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रभारी अरविंद देशमुख अध्यक्ष महेश पाटील यांच्यासह सर्व युवा मोर्चाचे शंभर हुन अधिक कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले.
यानंतर दर्शन घेतल्यानंतर उभाटा गटाचे उमेदवार सह सात-आठ लोकच मिरवणुकीत सहभागी असल्या कारणाने आणि भाजपाची संख्या अचानक वाढल्याने उबाटा गटाचे उमेदवारांना मिरवणुकीतून माघार घेण्याची चर्चा आज दिवसभर जळगाव शहरात रंगली होती एकंदरीत आज जळगाव शहरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच उबाठाच्या उमेदवारांना मात दिल्याचे बोलले जात आहे.
यावेळी उपस्थित भाजपा चे जिल्हा सरचिटणीस अमित भाटीया, अरविंद देशमुख, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महानगर प्रमुख महेश पाटील सरचिटणीस- जितेंद्र चौथे, विकास सोनार, सागर जाधव, अक्षय जेजुरकर, मा. नगरसेवक मयूर कापसे, गजानन वंजारी उपाध्यक्ष- अश्विन सैंदाणे, योगेश बागडे, सतनाम सिंग बावरी, राहुल पाटील, गौरव ढेकळे चिटणीस- हर्षल चौधरी गौरव पाटील कल्पेश भोईटे सोशल मीडिया प्रमुख मयूर भदाणे, सहसोशल मीडिया प्रमुख आर्यन शेट, संकेत शिंदे, दर्शन सोनवणे, समर्थ राणे मंडळ क्रमांक ९ चे अध्यक्ष मयूर ठाकरे, मयूर जोशी, धीरज पोरोहित इतर पधाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.