जळगाव (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक करिता उमेदवारी अर्ज घेण्याच्या दुसऱ्या दिवशी शिंदेंच्या शिवसेनेचे वैद्यकीय आघाडीचे जिल्हाप्रमुख डॉ. प्रमोद पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून भजपाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त उमेदवारी करणार असल्याचं जाहीर केलं आहे.यावरून महायुतीत धुसफूस उघड होतं फूट पडल्याचे दिसत आहे.
भाजप उमेदवाराची उमेदवारी अनिश्चित असून त्याबाबत साशंकता असल्याने महायुतीचा घटक म्हणून भाजपचा अर्ज विकत घेतल्याची माहिती स्वतः डॉ. प्रमोद पाटील यांनी दिली.भाजपच्या उमेदवाराबाबत प्रचंड नाराजी आणि वरिष्ठ नेत्यांबद्दल असंतोष असल्याने महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे.