छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – पटवलीच्या अवैध वन खनिज उपसा प्रकरणी विशेष तपास पथकाचा (SIT एस.आय.टी) अहवाल स्वीकारून त्या अनुषंगाने मा. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना ठोठावलेल्या 175 कोटीच्या दंडाला शासनाने स्थगिती दिली. या स्थगिती आदेशास आवाहन देणाऱ्या मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या याचिकेच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. आर. एम.जोशी यांनी राज्य शासन, नाशिकचे विभागीय आयुक्त, जळगावचे जिल्हाधिकारी, भुसावळचे उपविभागी अधिकारी व एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे, व रक्षा खडसे यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
स्थगिती आदेशास दिले होते आव्हान
खडसे यांनी त्यांच्या जमिनीतून एक लाख 18 हजार 202 ब्रास गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन केल्याचा अहवाल शासनातर्फे स्थापन एस.आय.टी ने सादर केला होता, तो शासनाने स्वीकारला होता, त्या अहवालावरून शासनाने कसे यांना 175 कोटीचा दंड ठोठावला होता. मात्र, खडसे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही.
नैसर्गिक न्याय तत्वांचा भंग केला, अशा कारणास्तव शासनाने विशेष तपास पथकांचा अहवाल व त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईला स्थगिती दिली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यास आव्हान दिले आहे. या याचिकेवर 30 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल. अशी माहिती मिळाली आहे.