जळगाव (प्रतिनिधी) – शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी देखील जाहीर केली आहे, या आधी ठाकरे गटाचे 17 उमेदवारांची यादी जाहीर केली होती.
शिवसेना उबाठा गटाची दुसरी यादी मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण वरून वैशाली दरेकर हातकणंगले – सत्यजित पाटील व जळगाव वरून करण पवार असे दुसरे यादीतील उमेदवारी जाहीर केलेली आहे.
करण पवार हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष असून ते शरद पवार गटाचे नेते तथा माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे पुतणे आहेत. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात अनेक मित्र संबंध आहेत. तसेच गत वेळी स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला विरोध करून तिकीट रद्द करायला लावणारा भाजपातील नाराज गट देखील करण पवार यांना मदत करायला तयार आहे, तसेच खासदार उन्मेष पाटील हे करण पवार यांच्यासोबत उभे राहिल्यास त्यांना भाजपने लोकसभेसाठी तयार केलेली सर्व रणनीती आपोआप वापरायला मिळेल.
अगदी खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्याला उमेदवारी जाहीर होईल या अपेक्षेने भाजपच्या रणनीती नुसार उभी केलेली यंत्रणा करण पवार यांनी “रेडी टू युज” मिळेल, अशी शिवसेनेची रणनीती आहे.