जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा मतदारसंघाचे खासदार उमेश पाटील यांनी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार तसेच अन्य सहकाऱ्यांसह आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. याच्या सविस्तर वृत्तांत पुढीलप्रमाणे असे आहे.
जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यात आले, असून त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याची कामगिरी चांगली असताना देखील पक्षाने त्यांचे तिकीट कापले, असून अनेकांना याचे आश्चर्य वाटत आहे. भाजपमधील अंतर्गत संघर्षातून उन्मेष पाटलांचा गेम करण्यात आल्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे. खुद्द उन्मेष पाटील यांनी आपल्याला पक्षाचा निर्णय मान्य नसल्याचे जाहीर केले, असले तरी ते उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत स्वतः उन्मेष पाटील अथवा त्यांच्या सौभाग्यवती संपदा पाटील यांना शिवसेना उबाठा पक्षाकडून उमेदवारी मिळेल असे मानले जात आहे.
खा. उमेश पाटील हे आपल्या समर्थकांसह मंगळवारी दुपारी मुंबई येथील मातोश्रीवर दाखल झाले होते. उन्मेष पाटलांनी सांगितले खासदार संजय राऊत यांच्याशी मैत्री असून यासाठी आपण मातोश्रीवर आले असल्याची माहिती त्यांनी दिली. तर संजय राऊत यांनी उन्मेष पाटील हे नाराज असून त्यांनी आपली “मन की बात उद्धव ठाकरे के साथ” उद्धव ठाकरे यांना मनातल्या गोष्टी सांगितले असून याबाबत अध्याप पर्यंत आपल्याला सर्व काही कळेल असे सांगितले. यानंतर जळगावचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी देखील उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेश लवकरच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. तर सुषमा अंधारे यांनी बुधवारी दुपारी साडेबारा वाजता उन्मेष पाटील यांचा शिवसेना पक्षात प्रवेश होणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले.
या दरम्यान, आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर खासदार उन्मेष पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा त्याग करून शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार तसेच अन्य सहकाऱ्यांनी देखील शिवसेना उबाठा मध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठाच धक्का बसला, असून जळगाव मतदारसंघात याचा परिणाम होण्याची शक्यता असू शकते, तर जळगावातून करण पवार यांना महाविकास आघाडी तर्फे शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार म्हणून तिकीट दिले आहे.