चोपडा (प्रतिनिधी) – येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गेरुघाटी ते वैजापुर रोड फरिस्ट नाका जवळ अवैध रित्या गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस आरोपी रेहमल जेमल पावरा यांच्या कडे आढळून आल्याने पोलिसांनी याला जेरबंद केले.
सविस्तर वृत्तांत असे आहे की, दि.30 रोजी 3;30 वाजता रोजी जिरायत पाडा, पो. मेलाने, ता. चोपडा येथील रहिवासी रेहमल जेमल पावरा वय-३३ वर्ष हा विना नंबर प्लेटची होन्डा कंपनीची मोटर सायकलवरून जात असताना पोलिसांच्या गुप्त माहिती वरून पोलिसांनी सदरील इसमास रस्त्यावरच थाबून विचारपूस केली असता त्यांच्या कडे एक बनावटी गावठी पिस्टल सह एक जिवंत काडतुस मिळून आले 25,000/- रु किंमतीचा एक गावठी बनावटी कटटा व 1000/- रु किंमतीचे काडतुस 50000 रुपयाची मोटारसायकल असे एकूण 76000 रुपयांचा मुद्देमालसह त्याच्याकडील असे हस्तगत केला.
संबंधित आरोपीच्या विरुद्धात पो.कॉ.चेतन सुरेश महाजन यांच्या फिर्यादि वरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला तसेच आरोपी रेहमल जेमल पावरा यास अटक करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोहेकॉ शशिकांत पारधी हे करित आहेत.