एरंडोल (प्रतिनिधी) – दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत असून मजूर ,शासकीय धोरणे, बी -बियाण्यांची पॉलिसी, खतांची पॉलिसी,वाढती महागाई,सांगायला हमीभाव पण हमीभावाचे कोणतीही हमी नसताना पिकवलेल्या मालाला कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेती करणे खूपच कठीण झाले आहे. म्हणून शेतीमध्ये राबणाऱ्या माझ्या माय माऊली महिला शेतकरी ने आता शेतीसह स्वयं रोजगाराकडे वळावे व आपले ध्येय साध्य करावे आणि ते फक्त संघटनेच्या माध्यमातून साध्य करता येईल असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले ते आडगाव तालुका एरंडोल येथे महिला आघाडी शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
गावातील महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पदाधिकारींना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता महाजन यांनी केले सुत्रसंचालन मीना पवार यांनी तर आभार प्रदर्शन संगिता तागड यांनी मानले.
महाराष्ट्र शेतकरी संघटनेची महिला नियुक्त पदाधिकारी आघाडीत शाखाध्यक्षा म्हणून संगिता तागड, कार्याध्यक्ष म्हणून वंदना महाजन, माहिती प्रमुख म्हणून मनिषा पाटील,उपाध्यक्ष म्हणून मनिषा सुतार, संपर्क प्रमुख म्हणून मालुबाई साबळे, खजिनदार म्हणून योगिता पाटील, महासचिव म्हणून योगिता लाळगे,सचिव म्हणून रेखा वनवे, प्रसार माध्यम प्रमुख म्हणून मिना पवार, सल्लागार म्हणून संगिता महाजन, जेष्ठ मार्गदर्शक म्हणून प्रमिला महाजन, आरोग्य प्रमुख म्हणून अमृता हारगोडे,सदस्य म्हणून आशाबाई पाटील, उषाबाई अहिरे,माधुरी हारगोडे, माया वनवे ,कल्पना तागड,मीना तागड, अनुसया पाडसे, ज्योती तागड ,ज्योती माळी ,मनीषा पाटील, संगीता महाजन, ज्योती पाटील.