जळगांव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीने विविध संघटनात्मक नियुक्त्यांवर भर देणे सुरू केले आहे यातच जळगाव शहरातील रेखा पाटील यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ओबीसी मोर्चा प्रदेश महिला संयोजक डॉ.उज्वला हाके, यांच्या आदेशानुसार रेखा पाटील यांना ओबीसी उत्तर विभागीय संयोजक पदी निवडीचे नियुक्तीपत्र हे नाशिक या ठिकाणी विजय चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच रेखा पाटील यांच्या माध्यमातून भाजपात मोठ्या संख्येने महिलांचा प्रवेश विजय चौधरी प्रदेश महामंत्री यांच्या हस्ते नाशिक या ठिकाणी करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीच्या विविध संघटनात्मक कामे तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजापर्यंत भाजपाने केलेली कामे पोचवण्याचे काम या माध्यमातून यांना करण्यात यावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस , भाजपाचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन , विजय चौधरी संघटन महामंत्री , ओबीसी मोर्जाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते , खासदार उन्मेश पाटील , आमदार (राजूमामा) सुरेश भोळे यांनी अभिनंदन केले आहे.