दिल्ली (प्रतिनिधी) – भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या मध्ये महाराष्ट्रातील २० जागांची उमेदवारी जाहीर केली असून काही नवीन उमेडवाऱ्यांना भाजपने संधी दिली आहे. तसेच भाजपने यादीमध्ये १९६ उमेवारांची नावे जाहीर केली आहे.
यामधील महाराष्ट्रातील २० जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
धुळ्यातून सुभाष भामरे
नंदुरबार मधून डॉ. हिना गावित
जळगाव मधून स्मिता वाघ
रावेत मधून रक्षा खडसे
अकोल्यातुन अनूप धोत्रे
वर्ध्यातुन रामदास तडस
नागपूर मधून नितीन गडकरी
चंद्रपूर मधून सुधीर मुनगंटीवार
नांदेड मधून प्रतापराव चिखलिकर
जालन्यातून रावसाहेब दानवे
यांच्या नावाचा समावेश आहे.
डिंडोरीतून भारती पवार
भिवंडीतून कपिल मोरेश्वर पाटील
मुंबई उत्तर मधून पियूष गोयल
मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा
पुण्यातून मुरलीधर मोहोळ
बीडमधून पंकजा मुंडे
अहमदनगरमधून सुजय विखे पाटील
लातूर मधून सुधाकर श्रृंगारे
माढ्यातून रणजीतसिंह निंबाळकर
सांगलीतून संजय पाटील
यांचा या यादीत समावेश आहे.
भाजपने महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना पुन्हा संधी दिली आहे, तर जुन्या नेत्यांचा पत्ता कट केला आहे. पंकजा मुंडे, स्मिता वाघ, मुरलीधर मोहोळ या तीन नवीन उमेदवारांना भाजपने संधी दिली आहे.