पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील बाळद बुद्रुक येथील दुग्ध उत्पादक सोसायटीचे नवनियुक्त चेअरमन तसेच व्हाईस चेअरमन यांचा सत्कार शिवसेना-उबाठा नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आला.
बाळद बुद्रुक सहकारी दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी नुकतीच अरुण सोमवंशी तर व्हाईस चेअरमनपदी शालीक जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड जाहीर होताच शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी या दोन्ही मान्यवरांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आंबादास सोमवंशी, सुभाष सोमवंशी, रवि सोमवंशी, राजेंद्र मोरे, दिलीप मोरे, प्रमोद सोमवंशी, बाळु मोरे, माधवराव सोनवणे, हीरालाल चव्हाण, सतीश रावण मोरे, जितेंद्र भीमसिंग सोमवंशी, दिलीप वामन सोमवंशी, अमोल अशोक बाविस्कर, लक्ष्मण चव्हाण व भुपेश सोमवंशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती होती.