जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात वाद झालेल्या त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची मेहुनबारे व यावर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.
शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊन धक्काबुक्की झाल्याची घटना घडली होती. या घटनेची पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, यातील सुधीर साळवे यांची मेहुनबारे येथे तर अल्ताफ पठाण यांची यावल पोलीस ठाण्यात या दोघांची बदली करण्यात आली आहे.