जळगाव (प्रतिनिधी) – पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी गेल्या सहा ते सात महिन्यापासून तालुका कृषी कार्यालयाच्या फेऱ्या मारूनही तांत्रिक अडचणी मार्गी लागत नसल्याने, गुरुवारी जळगाव तालुक्यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाकडून अखेर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलनाद्वारे प्रशासनाला दणका दिला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर , तालुका अध्यक्ष एडवोकेट हर्षल चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ भंगाळे यांच्यासह जळगाव तालुक्यातील किशोर चौधरी, गिरीश वराडे, मिठाराम पाटील, परेश लोखंडे, सुधाकर पाटील, ईश्वर जाधव, हरी कोल्हे, लीलाधर पाटील, आदी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.