जळगाव (प्रतिनिधी) – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नियुक्ती करून राज्यभर घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले आहे. यासाठी मानधन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही मोबदला न मिळाल्याने महात्मा फुले शिक्षण संघटनेने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. एल.एन.महाजन, योगेश पवार, प्रवीण पाटील उपस्थित होते.