जळगाव (प्रतिनिधी) – पोलीस कवायत मैदानावर ५ दिवसीय महा संस्कृती महोत्सवाला बुधवारी सायंकाळी प्रारंभ होणार आहे. पालकमंत्र्यांसह, तीनही मंत्री, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
दि. २८ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान हा महोत्सव होणार आहे. विनामूल्य सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हाभरातील प्रेक्षकांना सहभाग घेता येणार आहे. सायंकाळी ५.३० ते रात्री ९.३० वाजे दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात बचत गटाचे सुमारे २५० स्टॉल लावण्यात येणार आहे. तसेच विविध स्पर्धेचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे.
दी. २८ रोजी पारंपारिक नृत्य स्पर्धा, शिवकालीन इतिहासावर निबंध स्पर्धा, दी. २९ रोजी पारंपारिक वेशभूषा, वकृत्व स्पर्धा, दि. १ मार्च रोजी चित्रकला स्पर्धा, दी. ३ रोजी महासंस्कृती मॅरेथॉन, स्केटिंग रॅली होणार आहे. या ५ दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची स्थापना, प्रतिकृती व इतर प्रदर्शनाचे दालन सर्वांसाठी खुले राहणार आहे.