जळगाव (प्रतिनिधी) – कासोदा गावात पोलीस स्टेशनला आजपर्यंत अनेक कर्तव्य दक्ष अधिकारी लाभले त्यात बदली झालेले थोड़के लोकच कायम स्मरणात राहिले. अशातल्याच एक कमी कालावधी लाभला असताना देखील गावकऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवीणाऱ्या कर्तव्य दक्ष महिला पोलिस अधिकारी म्हणून योगिता नारखेड़े यांचे नाव घेता येईल.
अल्पावधितच संबंध गावातील नागरिकांचा तसेच आपल्या हद्दीतील गावातील नागरिकांचा मोठा विश्वास संपादन करत गुन्हेगारांवर कायद्याचा बडगा वापरत गावात शांतता कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यात त्यांना यश आले.
त्याचप्रमाणे अधिकारी कसा असावा त्याचे गावातील गोरगरीब, सामान्य लोकांसोबत वागणूक कशी असावी याचा योग्य तो धड़ा त्या त्यांच्या कारकीर्दित देऊन गेल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर त्यांची इतर ठिकाणी बदली झाल्याची माहिती गावकऱ्यांच्या कानावर पडताच गावातील नागरिकांच्या मनात नाराजी पसरली.
त्यानंतर नागरिकांनी स्वखर्चाने त्यांची (घोड़ागाड़ी) बग्गी वरून बैंड बाजा लावत नाचत गाजत भव्य अशी मिरवणूक काढून डोळ्यात अश्रु लपवून आनंदाने महिला पोलिस अधिकारी योगिता नारखेड़े निरोप दिला.
गावाच्या इतिहासात इतका मानसन्मान अजुन पर्यंत एकाही अधिकार्याला मिळालेला नाही. यावरून आपन कस वागलो आणि बदली झाल्यावर मिळालेला मान सन्मानच सांगून जातो, की योगिता नारखेडे यांची बदली असता खुप मोठ नाव कमावून गेल्या. महिला पोलिस अधिकारी योगिता नारखेड़े योगिता आपली कारकीर्द आमच्या कायम स्मरणात राहिल.