पारोळा (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या जिवावर सर्व अर्थव्यवस्था चालते, व्यापार चालतो, सर्व व्यावसायिक संघटीत पणे वापर करतात मग आपणच का संघटीत होत नाही ? पण आता आपण सर्व शेतकरी, महिला, युवक-युवती संघटनेच्या माध्यमातून संघटीत होणे आवश्यक आहे. कारण संघटीत झाल्या शिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले ते मेहू येथे महिला आघाडी शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाला महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या राज्य महिला अध्यक्षा कल्याणी देवरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. की, शेतकऱ्यांच्या सुख – दुःखात त्यांची पत्नी, आई आणि मुलगी खबिर पणे उभी राहते अगदी त्याच पध्दतीने आता आपण महिला आणि युवती आघाडीच्या माध्यमातून उभे राहायचे आहे. तर युवती आघाडी अध्यक्षा कुसुम बाविस्कर यांनी युवतींनी का यावे आणि संघटनेत काय फायदे होतात तसेच संकल्पनाची माहिती दिली.
यावेळी युवती तालुका अध्यक्ष कुसुम बाविस्कर यांच्या सह गावातील महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पदाधिकारीनी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शेतकरी संघटनेची महिला आघाडीत शाखाध्यक्षा म्हणून कमल पाटील, कार्याध्यक्ष म्हणून आशा पाटील, माहिती प्रमुख म्हणून संगिता पाटील, उपाध्यक्ष म्हणून सुरेखा पाटील, संपर्क प्रमुख म्हणून मंजुषा पाटील, खजिनदार म्हणून सुवर्णा पाटील, महासचिव म्हणून सुनंदा पाटील,सचिव म्हणून संगिता सुरेश,प्रसार माध्यम प्रमुख म्हणून शकुंतला पाटील, सल्लागार म्हणून रंजना पाटील, जेष्ठ मार्गदर्शक म्हणून मिराबाई पाटील, आरोग्य प्रमुख म्हणून मंगलबाई पाटील तर सदस्य म्हणून वैशाली पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.