जळगाव प्रतिनिधी – जळगाव मधून एक धक्कादायक बातमी येत आहे. गिरणा नदीतून होत असलेल्या वाळू उपशामुळे नदी पात्रात झालेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले आहेत. एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण सोमवार रोजी सकाळी कामावर गेला होता. गिरणा नदीपात्रात सध्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने नदी वाहती झाली आहे. दरम्यान काम आटोपून हा तरुण सायंकाळी घरी परतत असताना गिरणा नदी पात्रातील नेहमीच्या वाटेने येत होता. मात्र नदी ओलांडत असताना पाण्याचा अंदाज आला नाही व तो पाण्यात बुडाला. पाण्याचा अंदाज न आल्याने हा तरुण डोहात बुडाला. त्याला बाहेर निघता न आल्याने त्याचा करुण अंत झाला.
मंगल इघन बाविस्कर असे मृत तरुणाचे नाव असून जळगाव तालुक्यातील बोरनार येथील मंगल बाविस्कर हा तरुण मजुरीचे कामे करत होता. या घटनेप्रकरणी सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.