चंदीगड मधुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घराशेजारील अंगणात खेळत असणाऱ्या चिमुकलीवर अचानक भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. ति घरच्या दिशेने पळत सुटली पण धावता-धावता ती जमिनीवर कोसळली. या दुर्घटनेत चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, बुधवारी दुपारच्या वेळी खेळत असलेल्या एका चिमुकलीवर अचानक भटके कुत्रे धावून आले. कुत्रे आपल्याकडे येत असल्याचे पाहून चिमुकली प्रचंड घाबरली. घराकडे पळत असताना ती खाली रस्त्यावर पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. हि चिमुकली इयत्ता दुसरीत शिकत होती. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर भटके कुत्रे हल्ला करीत असून कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये आजवर अनेकजण जखमी झाले आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी, मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.