दर्यापूर तालुक्यातील नाचोना या गावातुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अंगणात गप्पा करत अंगात बसलेल्या कुटुंबातील सहा लोकांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नाचोना गावात वास्तव्यास असलेल्या अंभोरे कुटुंबीय आपल्या घराच्या अंगणात गप्पा करत बसले असताना अचानक त्यावेळी संशंयित आरोपीने गप्पा करत बसलेल्या अंभोरे कुटुंबियांना चिरडलं. पूर्व वैमनस्यातून त्याने हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अनुसया शामराव अंभोरे, शामराव लालूजी अंभोरे, अनारकली मोहन गुजर, असं मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.