जळगाव प्रतिनिधी – जळगाव तालुक्यातील नेरी – म्हसावद रस्त्यावर एका केमिकल टँकर ने रस्त्यावरून जाणाऱ्या म्हशीसह एकाला उडविल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात एक व्यक्ती व एक म्हैस जागीच ठार झाले. घटना घडल्यानंतर गावातील संतप्त नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत वाहतूक रोखून धरली त्यामुळे सुमारे तीन तास रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या व ट्राफिक ठप्प झाली होती.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नेरी – म्हसावद विटनेर येथे मंगळवार रोजी दुपारच्या वेळी म्हशी चरवून घरी येत असताना केमिकल्स ने भरलेले टँकर भरगाव वेगाने आल्याने रस्त्याने जाणाऱ्या म्हशीसह सुकलाल सोनवणे याना जोरदार धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती कि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर गावातील नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याने तब्ब्ल तीन तास वाहतूक अडवून धरली होती. या रस्त्यावर असे अनेक छोटे मोठे अपघात नेहमीच होत असतात त्यामुळे नागरिक आक्रमक झाले.