आजकाल अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाण हि वाढले आहे. अशातच नगर – कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीत येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाच परिवारातील चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटाकडून भाजीपाला घेऊन ओतूरकडून कल्याणकडे जात असताना कल्याणकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षेला पेट्रोलपंपासमोर पीकअपची धडक लागली. या अपघातात रिक्षामधील चालक आणि २ प्रवासी यांचा मृत्यू झाला. तसेच पीकअप चालक, स्वतःव कॅबिनमध्ये बसलेली त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी आणि मागे बसलेला हमाल असे सर्वजण पीकअपमध्ये बसले होते. धडक दिल्याने पीकअप डाव्या बाजूस पडून घसरत जाऊन कल्याणकडून येणाऱ्या ट्रकची धडक बसली. या अपघातात पीकअप मधील ५ जण असे एकूण ८ जणांचा जागीच मृत्यू झाला.
गणेश मस्करे (वय ३०), कोमल मस्करे (वय २५), हर्षद मस्करे (वय ४), काव्या मास्करे (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंबीय जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथून मेव्हणीच्या लग्नावरून रात्री उशिरा घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.