आपण सुंदर आणि आकर्षक दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं. यासाठी बऱ्याच उपाययोजना केल्या जातात. महागडी कॉस्मॅटिकस वापरल्या जातात पण दरवेळी याचा फायदा होतोच असे नाही. हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे. ओठ फुटणे यासारख्या बऱ्याच समस्यांना अनेकांना सामोरे जावे लागते. अशाच समस्यांना उपाय म्हणून तुम्ही काही उपाय करू शकतात.
कोरफड आणि हळद
कोरफड हे त्वचे साठी थंड असत कोरफड जेल घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून चेहऱ्यावर आणि मानेवर १५ मिनिटे लावावी. हे मिश्रण रोज लावले तरी हरकत नाही. याने चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होतो.
वाफ घेणे
चेहऱ्यावर वाफ घेणे हे सुद्धा उत्तम उपाय आहे. गरम पाण्यामध्ये लिंबाचे काही थेंब टाकून तुम्ही वाफ घेऊ शकता. वाफ घेतल्यावर चेहऱ्यावर चमक येते. त्वचेवर ची घाण साफ होते. आठवड्यातून एकदा वाफ घ्यावी.
मुलतानी माती व दही फेसपॅक
मुलतानी माती हि चेहऱ्यासाठी खूप छान असते. एक चमचा मुलतानी माती मध्ये एक चमचा दही घालून १५ मिनिटे चेहऱ्यावर लावावी यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.