जळगाव (प्रतिनिधी) – मनाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी मन एका सुंदर बागेप्रमाणे हाताळायला हवे व चांगले विचार मनात आले पाहिजे तेव्हा तुम्ही प्रसन्न राहणार. सुकलेल्या फुला आणि पानांप्रमाणे मनातील नकोसे विचार काढून टाकले तर नवीन ताजेतवाणे विचार मनात येतील व अभ्यासात ही मन लागेल, असे प्रतिपादन इनरव्हील क्लब जळगावच्या प्रकल्प प्रमुख आणि मोटिवेशनल स्पीकर सकीना लेहरी यांनी केले.
इनरव्हील क्लब जळगावच्या माध्यमातून केसीई सोसायटीच्या आयएमआर महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेप्रसंगी इनरव्हील क्लब जळगावच्या अध्यक्षा सुरमीत छाबडा, सचिव फातेमा राजकोटवाला, माजी अध्यक्षा हेतल सुरतवाला आदी उपस्थित होते. उपक्रमासाठी आयएमआरच्या संचालिका शिल्पा बेंडाळे, ममता दहाड, श्वेता हेगडे यांचे सहकार्य लाभले.