एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल गावातील भडगाव तालुक्यातून गावात मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येते आहे. तरी त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही.
इतक्या लांबून दिवसाढवळ्या वाळू चोरून आणून विकणाऱ्या टोळी मागे कोणाची तरी वरदहस्त असू शकतो असा अंदाज आहे. कोणाच्या तरी कृपा आशिर्वादाने वाळूची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे, वाळूची वाहने अत्यंत वेगाने जातात त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि जर या ठिकाणी कोणाची जिवी हानी झाली तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न गावातील व रस्त्यावरील वाहतूक करणाऱ्या ना पांडला आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या वाळू माफियांवर लक्ष देण्याची मागणी एरंडोल तालुक्यातील वाहनधारकांनी केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आडगाव,पिंपरखेड मार्गाने ही वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून काही लोक हफ्ते खोरी करत असल्याची चर्चा देखील सुरू असल्याची माहिती या ठिकाणी मिळाली आहे. अशा होते हप्ते खोरांवर्ती कारवाई झाली पाहिजे.