जळगाव (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, परीक्षाविधीन जिल्हाधिकारी अर्पित चौहान, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार (कुळ कायदा) उषाराणी देवगुणे, तहसीलदार विजय बनसोडे, तहसीलदार (संगायो) जितेंद्र कुवर, नायब तहसीलदार रूपाली काळे आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.